मानगुटीवरचं भूत (अर्थात मोबाईल चा अतिरिक्त वापर)

पेपर मध्ये एक बातमी वाचली, एक मुलगी चालताना मोबाईल फोन वर मेसेज करत करत खड्यात पडली वय वर्षे 20, अन डोळ्यापुढे टाकलेल्या म्हणा किंवा पडलेल्या म्हणा अनेक तरुण माना आल्या.

तांत्रिक प्रगतीने संवाद साधण्याची माध्यमं वाढत गेली, प्रत्यक्ष भेटणं नंतर पत्रं संवाद, आता डिजिटल संवाद व शेवटी स्मार्ट फोन, मग WhatsApp वरच काय चाललंय म्हणणं असो वा फेसबुक status किंवा twitter चा चिवचिवाट ह्या पासून ते प्रत्येक गोष्ट गुगल करण्याची सवय (१२ गुणिले 3 पण google करताना मी एकाला पाहिलंय) शिवाय फक्त अंगठे screen वर आपटून खेळायच्या गेम असो …माना खाली झुकलेल्याच, कोपरे दुमडलेले अन अंगठ्यांची आदळआपट.

कोणतीही गोष्ट जास्त वापरली तर ती लवकर झिजते ह्या निसर्गाच्या नियमानुसार सतत होणारा मान कोपर व अंगठ्यांचा वापर नवीन नवीन आजार निर्माण करतोय.

अगदी वयाच्या सतराव्या वर्षीच मानदुखी, हातातून मुंग्या येणं, कोपर अवघडन किंवा अंगठ्याच दुखणं हि लक्षणे दिसू लागली आहेत बरं ह्यावर वापरणं बंद करा म्हणता येत नाही. (Facebook वर like नाही केली whatsapp वर chat नाही केलं थोडे दिवस तर किती नुकसान होत मला पामराला कसं कळणार.)

शिवाय ह्या कोरोनचा आणखी एक उपकार ….. म्हणजे आता आवश्यकच असा मोबाईल अथवा लॅपटॉप चा उपयोग.

बाकी मला इंग्रजांचं कौतुक वाटतं किती भारी नाव देतात अगदी आजाराला पण ..

Device addiction, Text neck, cellphone elbow, scrolling thumb

हि आपली पुढची diagnosis असणार आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळं वेळीचं सांभाळा. मानगुटीवर बसू पाहत असलेलं हे भूत फक्त आपणच उतरवू शकतो. ते फक्त दिवसातील काही वेळ जाणून बुजून मोबाइल टाळून व हलके फुलके व्यायाम करून. हे फक्त शाररिक परिणाम झाले मानसिक तर त्याहूनही वाईट त्यावर नंतर कधीतरी. (नाहीतर लोका सांगे ब्रम्हज्ञान.. व्हायचं)

चला मग थोडं ताठ मानेनं जगूया, पटलं तर share करा आवडलं असेल तर कंमेंट करा.

डॉ शरयू, डॉ निलेश रामराव पाटील.

आयुर्ग्राम, ९९७०२७८७०७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *