देश कोणताही असो त्याचे बलस्थान असते ते त्या देशातील नागरिक,
इतर कोणत्याही भौगोलिक आर्थिक अथवा व्यावसायिक पाठबळापेक्षा त्या देशातील सक्षम नागरिक हीच त्या देशाची खरी संपत्ती असते, कारण संपूर्ण बेचिराख होऊन देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ सामूहिक इच्छाशक्तीवर परत उभारलेले देश इतिहासाने पाहिले आहेत,
त्यामुळेच समृद्ध देश बनवायचा असेल तर समृद्ध नागरिक पहिला उभे केले पाहिजेत.
मनाचे ३ गैरसमज जे तुम्हाला कमकुवत बनवतात
१) स्वतःच्या कमजोरीचा स्वीकार न करणे
बरीच लोक स्वतःच्या नकारात्मक गोष्टी एक तर लपवून घाबरून जगत असतात अथवा त्या गोष्टीचा उपयोग सहानभूती मिळवण्यासाठी करत असतात, थोडक्यात कमकुवत मुद्द्यांना घेऊन एक तर घाबरत असतात अथवा रडत असतात,
पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या नकारात्मक बाजू सर्व जगासमोर स्विकारता त्यावेळी ना तुम्हाला घाबरावे लागतं ना तुम्हाला रडावं लागतं
स्वतःवर प्रेम करणं म्हणजे केवळ स्वतःला पाहिजे त्या गोष्टी पुरवणं हे नसून आपण जसे आहोत त्याचा प्रथम स्वतःचा स्वीकार करणं होय
त्यामुळे तुमचं आनंदी राहायचं असेल प्रगती करायची असेल तर सर्वप्रथम स्वतःच्या कमजोरीचा अगदी मनापासून स्वीकार करा.
२) स्वतः बाबत अस्ताव्यस्त अपेक्षा ठेवणे
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांनी, म्हंटल्याप्रमाणे “लोखंडाला दुसरी कोणतीही गोष्ट नष्ट करू शकत नाही पण त्याचा स्वतःचा गंज त्याला नष्ट करू शकते तसेच माणसाला फक्त त्याची मानसिकता नष्ट करू शकते”
सगळ्याच गोष्टी मीच ठरवणार, सगळीच काम मी करणार हा स्वभाव तुमच्या मनाला थकवा देऊ शकतो त्यामुळे स्वतःबद्दल अस्ताव्यस्त अपेक्षा ठेवून असमाधानी प्रवृत्तीने जगण्यापेक्षा समाधानी वृत्ती ठेवून आनंदी व प्रगतिशील आयुष्य जगणं कधीही फायद्याच
३) “लोक काय म्हणतील” सिन्ड्रोम
स्पॉट लाईट इफेक्ट , आपल्याकडे सतत कोणीतरी बघत आहे हा विचार घेऊन आपण आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतो, म्हणजेच त्या गोष्टी खरेदी करत असतो याची आपल्याला गरज नाही त्या गोष्टी करत असतो ज्याची आपल्याला खरंच आवड नाही
दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, ह्या उक्तीप्रमाणे आपण आपल्याला आवडणाऱ्या अनेक गोष्टी केवळ समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील या विचारानेच टाळत असतो त्यामुळे स्वतःचीच कुचंबना होऊन ना आपली प्रगती मिळते ना आपण आनंदी राहू शकतो.
जेव्हा लोक काय म्हणतील याचा विचार न करता, जे बरोबर आहे व जे आपल्याला आनंद मिळवून देईल अशा गोष्टी आपण करायला सुरुवात करू तेव्हा नक्कीच आपण जास्त स्वतंत्र असू.
तर, मित्रांनो आजच्या दिवशी निश्चय करा स्वतः च्याच प्रगतिआड येणाऱ्या स्वतःलाच दुःख देणाऱ्या या स्व निर्मित मानसिक गुलामगिरीतुन आजच्या स्वातंत्र्य दिनी मुक्त व्हाल.
Don’t take your life for granted !
लेख आवडला असल्यास कृपया शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया नोंदवा,
धन्यवाद
Dr. Nilesh R Patil
9970278707