वमन

आयुर्ग्राम आयुर्वेद – 9970278707

पंचकर्म म्हंटलं की अभ्यंग, स्वेदन आणि बस्ती हेच चित्र उभं राहतं त्यातही शिरोधारा शिवाय नस्य हे उठावदार दिसतात.

पण पहिलं पंचकर्म अर्थात वमन हे किंचित दुर्लक्षितच होतं, वातावरणातील थंडी कमी होऊ लागली की वसंत ऋतूची चाहूल लागते अन वाढणाऱ्या कफाची देखील, त्याच प्रकुपित कफावरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे वमन पंचकर्म.

वमन अर्थात उलटी द्वारे शरीरातील अतिरिक्त दोष बाहेर काढणे, आता उलटी द्वारे शरीरातील घाण बाहेर काढणं हे थोडस किळसवाणे वाटत असलं तरी ह्याचे परिणाम बघता हे कर्म खरच खूपच प्रभावशाली आहे.

त्यामुळे आजच्या लेखात आपण पाहू या विषयीचे काही प्रश्न तर काही गैरसमज.

आयूर्ग्राम आयुर्वेद – 9970278707

१) आम्ही रोजच उलटी करून घाण बाहेर काढतो तर मग वमन का करावे ?

याचे उत्तर आहे उलटी हे तुम्ही रोज जरी करत असला तरी त्याला पूर्व कर्माची जोड नसते आणि शिवाय उलटी करण्याची पद्धत देखील ही काही प्रमाणात चुकीची असू शकते. त्याने फायदा होण्यापेक्षा त्रासच होऊ शकतो.

वमन हे रोज उलटी प्रकारातील गोष्ट नाही तर वैद्यांच्या देखरेखी खालील पूर्व नियोजित सर्व कर्म करून मग एकच दिवस घडवून आणली जाणारी पद्धत आहे.

२) वमन पंचकर्माला किती वेळ लागतो ?

संपूर्ण वमन कर्म हे साधारणता 13 ते 15 दिवसांपर्यंत ची प्रक्रिया राहू शकते यामध्ये अर्थातच उलटी ही फक्त एकच दिवस घडवून आणली जाते आणि ती देखील हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली. बाकीचे इतर दिवस ही वमनाची पूर्व तयारी म्हणून आणि वमनानंतर करावयाचे उपचार ह्यात समाविष्ट असतात.

३) वमन पंचकर्मातील टप्पे कोण कोणते ?

वमन पंचकर्म हे सामान्यतः पाच टप्प्यांमध्ये केलं जातं त्यामधील

पहिला टप्पा आहे दीपन पाचन – ह्यामध्ये तुम्हास काही औषधे दिली जातात ज्याने पुढील कार्यास मदत होते व शरीरातील अग्नी प्रदीप्त होतो.

दुसरा टप्पा आहे स्नेहपान – अर्थातच तूप अथवा तेल पिणे, तुमच्या प्रकृतीनुसार वैद्य हा कोणते तूप अथवा तेल प्यायचे आहे, त्याचे मात्रा किती द्यायची आहे हे ठरवून घेतो आणि हे साधारणत: ३ ते ७ दिवस चालू शकते.

तिसरा टप्पा आहे विश्रामकाल – ह्यात सांगितलेला आहार घेऊन विश्रांती करणे अपेक्षित आहे

चौथा टप्पा म्हणजेच साक्षात वमन – या दिवशी संपूर्ण शरीरास अभ्यंग आणि स्वेदन करून नंतर काही औषधे व काढे यांच्या साह्याने उलटी घडवून आणली जाते यामध्ये शेवटी पित्त दोष बाहेर पडणे अपेक्षित असते

नंतर आहार हा चढत्या क्रमाने दिला जातो तोच पाचवा टप्पा म्हणजे संसर्जन क्रम.

आयुर्ग्राम आयुर्वेद – 9970278707

४) वमन पंचकर्माचे नक्की फायदे तरी काय ?

ज्या व्यक्तींना कोणतेही आजार नाहीत त्या व्यक्तींना कफाचे आजार होऊ नये म्हणून तसेच शरीर शुद्धी करण्यासाठी आपण वमन कर्म करू शकतो.

दीर्घकाळ चालणारा कोरडा खोकला तसेच फुफ्फुसाचे विकार उदाहरणार्थ दमा, जुनाट सर्दी, मधुमेह, थायरॉईडचे विविध आजार, ऍलर्जि, भूक न लागणे वरचेवर तोंड येणे तसेच त्वचा विकार कानाचे आजार यामध्ये आपण वमन कर्म करू शकतो.

शिवाय वजन वाढणे पाळी न येणे अथवा उशिरा येणे आम्लपित्त अपचन यामध्ये सुद्धा वमन कर्म अत्यंत लाभदायी ठरते.

थोडक्यात कायमची असणारी सर्दी खोकला व आम्लपित्त यामध्ये वमन हे वरदानच होय.

५) वमन करताना कोणती काळजी घ्यावी?

कोणतेही पंचकर्म करताना काही साधारण नियम सांगितले जातात ते नियम हे तुमच्या दररोजच्या कामानुसार ठरवले जाऊ शकतात. आहार विषयक हे पथ्य पालन नक्की उत्तम परिणाम देण्यास मदत करतात .

६) वमन कोणी करू नये?

अत्यंत वृद्ध तसेच बालक व गर्भिनी यांनी शक्यतो वमन करू नये. तसेच हृदयरोगाचा काही त्रास असल्यास, ब्लड प्रेशर जास्त राहत असल्यास डॉक्टरच्या सल्यानुसार व वमन करावे अथवा करू नये याचा निर्णय घेता येतो.

चला तर मग वमन पंचकर्म करून घेऊयात!

Ayurgram ayurvedic Panchakarma hospital,
Pipeline Road, Ganesh Nagar, Ravet, Pune

संपूर्ण आयुर्वेद

www.ayurgramayurveda.com

  • आयुर्वेद चिकित्सा
  • पंचकर्म उपचार
  • योग थेरपी
  • आयुर्वेद औषधालय
  • आंतररूग्ण विभाग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *