समत्वम् योग उच्यते ||
आयुष्यात साधता येणारा समतोल म्हणजेच योग.
ही पण योगा ची आणि एक व्याख्या,
अन हा मन – शरीर आरोग्याचा समतोल कधीतरी, कुठेतरी आपल्याला सापडलाय अस होत नाही, हा समतोल प्रयत्नपूर्वक सांभाळावा लागतो
कारण योग म्हणजे फक्त आसन प्राणायाम न्हवे तर योग ही एक आयुष्यात समतोल राखणारी जीवन शैली आहे,
जी आपणाला जपावी लागणार आहे, अन त्या साठी खरा योग जाणून घेणं हीच पहिली पायरी आहे, आता योग म्हणजे फक्त आसन अन प्राणायाम न्हवे हे समजून घेणं महत्वाचं, कारण जेव्हा जेव्हा योग शब्द येतो तेव्हा तो “अष्टांग योग” अभिप्रेत आहे.
आपणा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
डॉ. निलेश पाटील